General Classification of metals / धातूंचे साधारण वर्गीकरण
General Classification of metals / धातूंचे साधारण वर्गीकरण
“2.2) what is metals? / धातू म्हणजे काय?” ह्या भागात आपण खालील प्रमाणे द्रव्याचे तीन प्रकार, त्यांचे उप प्रकार व गुणधर्मानुसार वर्गीकरण पहिले. 1) Matter (द्रव्य) a) Elements (मूलद्रव्य) i) Metals (धातू) (1) Ferrous Metals (लोहयुक्त धातू) (a) Pure Ferrous (शुद्ध लोह धातू) (b) Mixture of Ferrous (मिश्र लोहधातू) (2) Non Ferrous Metals (लोहेतर धातू) (a) Pure Non Ferrous (शुद्ध लोहेतर धातू) (b) Mixture of Non Ferrous (मिश्र लोहेतर धातू) ii) Non Metals (अधातू) b) Compounds (संयुगे) c) Mixtures (मिश्रणे) ह्या भागात धातुशिल्पी (Craftsman) च्या दृष्टीने, धातुकामातील उपयुक्ततेनुसार धातूंची माहिती घेऊ. |
आपण ह्यापूर्वीच
अभ्यासले की, धातूचे दोन प्रकारात वर्गीकरण होते
१. लोहयुक्त धातू (Ferrous Metals) व २. लोहेतर धातू (Non Ferrous Metals)
१. लोहयुक्त धातूंपासून निर्मित लोखंड (Iron) व निष्कलंक पोलाद (Steel) हे धातू मानवासाठी विविध यंत्र, वाहन, वस्तू, बांधकाम, इत्यादींच्या निर्मितीसाठी सर्वाधिक उपयोगी ठरले आहेत. लोखंडाच्या शोध नंतर मानवाने उद्योग क्षेत्रात प्रचंड मोठी उत्क्रांती घडवून आणली.
२. लोहेतर धातूंचे पुढील तीन भागात वर्गीकरण होते.
a. श्रेष्ठ धातू (Nobel Metals) व मौल्यवान धातू (Precious Metals)
b. मूल धातू (Base Metals)
c. मिश्र धातू (Alloys)
a. श्रेष्ठ व मौल्यवान धातू: श्रेष्ठ धातूंवर वातावरणाचा फारसा परिमाण होत नाही, त्यांचे ऑक्सिडीभवन (Oxidization) होत नाही व त्यामुळे त्यांची चकाकी, मूळ रंग कायम राहतात. तसेच भू-कवचात (Earth Crust) ह्या धातूंचे प्रमाण सुधा अत्यल्प आहे. श्रेष्ठ धातूंपैकी ज्या धातूंचा उपयोग आभूषण, अलंकार, दागिने, इत्यादीं निर्मितीसाठी केला जातो त्यांना मौल्यवान धातू म्हणून संबोधले जाते. रुथेनियम (Ruthenium) [Ru], रोडियम (Rhodium) [Rh], पॅलेडीयम (Palladium) [Pd], ऑस्मियम (Osmium) [Os] हे श्रेष्ठ धातू असून त्यातीलच सोने (Gold) [Au], चांदी (Silver) [Ag], प्लॅटिनम (Platinum) [Pt] यासारखे धातू हे मौल्यवान धातू म्हणून गणले जातात.तांबे (Copper) [Cu], अल्युमिनियम (Aluminum) [Al], जस्त (Zinc) [Zn], शिसे (Lead) [Pb], टीन (Tin) [Sn], निकेल (Nickel) [Ni], इत्यादी धातूंचा मूल धातू म्हणून समावेश होतो.
c. मिश्र धातू: दोन किंवा अधिक मूल धातू; किंवा मूल धातू व मौल्यवान धातू यांच्या मिश्रणातून उपयोगी असे मिश्र धातू बनवले जातात. पितळ (Brass), कासे (Bronz), पिवटर (Pewter), जर्मन सिल्व्हर (German Silver) किंवा निकेल सिल्व्हर (Nickel Silver), स्टर्लिंग सिल्व्हर (Sterling Silver), कॅरेट गोल्ड (Caret Gold), इत्यादी मिश्र धातू चे प्रकार आहेत.
i. ज्या मिश्रधातू मध्ये कुठल्याही दोन धातूंचे मिश्रण असते त्यांना ‘द्विघटकी मिश्रधातू’ (Binary Alloy) म्हणतात.
ii. ज्या मिश्र धातूंमध्ये कुठल्याही तीन धातूंचे मिश्रण असते त्यांना ‘त्रिघटकी मिश्रधातू’ (Ternary Alloy) म्हणतात.
वरील माहिती प्रमाणे धातुकामात उपयोगी धातूंचे १. मौल्यवान धातू, २. मूल धातू व ३. लोहयुक्त धातू अश्या भागात विभाजन करून त्यांची व त्यांच्यापासून निर्मित मिश्र धातूंची माहिती पुढील भागात घेऊ.
१. मौल्यवान धातू (Precious Metals)
a. सोने (Gold) [Au]
b. चांदी (Silver) [Ag]
c. प्लॅटिनम (Platinum) [Pt]
२. मूल धातू (Base Metals)
a. तांबे (Copper) [Cu]
b. पितळ (Brass)
c. ब्राँझ (Bronz)
d. शिसे (Lead) [Pb]
e. टीन (Tin) [Sn]
f. जस्त (Zinc) [Zn]
g. अल्युमिनियम (Aluminium) [Al]
h. निकेल (Nickel) [Ni]
i. पारा (Mercury) [Hg]
३. लोहयुक्त धातू (Ferrous Metals)
a. लोखंड (Iron) [Fe]
b. निष्कलंक पोलाद (Steel)
Image by Gerd Altmann from Pixabay
0 टिप्पण्या
Subject related questions, comments and suggestions are always welcome.
Emoji_Yashwant B Bhavsar, (STUDIO MEENAMEL)