2.1) Discovery of Metals / धातूचा शोध
इतिहास
आजपासून अंदाजे ४५०० कोटी वर्षांपूर्वी जेंव्हा पृथ्वीची निर्मिती झाली असेल, त्यावेळी पृथ्वी हा एक उकळत्या लाव्हारसाच्या गोळ्याप्रमाणे असेल. कालांतराने हा लाव्हा जसा जसा थंड होत गेला, तसे पृथ्वीचे कवच तयार होऊ लागले. ह्या कवचावर काही घटक हे शुद्ध धातू, मूलद्रव्ये व खनिज स्वरूपात राहिले. त्यांचाच आपण आता विविध पद्धतीने वापर करत असतो.
अतिरिक्त माहिती: {पृथ्वी, वातावरण, आपल्या सभोवताली असलेले सर्व घटक किंवा पदार्थ हे द्रव्यांचे (Matter) चे बनलेले आहेत. हे द्रव्य (Matter) चे गुणधर्म नुसार तीन भागात वर्गीकरण होते १. मूलद्रव्य (Elements), २. संयुग (Compounds), व ३. मिश्रण (Mixture). तसेच द्रव्याच्या अवस्थेनुसार चार प्रकारात विभाजन होते. १. स्थायुरूप / घन अवस्था Solid State), २. द्रवरूप (Liquid State), ३. वायुरूप (Gaseous stat) आणि ४. प्लाझ्मा [Plasma (प्लाझ्मा ही द्रव्याची अणु-रेणूंचे विद्युत चुंबकीय बंध असलेली अवस्था आहे)]. वर द्रव्याच्या जी तीन गुणधर्म वर्णन केले आहेत, त्यापैकी “मूलद्रव्य (Elements)” ह्या प्रकारात बहुतेक धातू आहेत.}
प्रागैतिहासिक काळातील मानवाला दगडापासून हत्यार बनवण्याची कला पूर्वीच अवगत झाली होती, पाषाण युगाच्या काळात त्याला अग्निचाही शोध लागला होता. त्यामुळे अशी एक शक्यता आहे कि, आदिमानवाला शेकोटीत एखादा असा दगड सापडला असेल जो आगीत जास्त गरम झाल्यावर आपला आकार बदलत असेल. ह्या दगडाला ठोकल्यानेसुद्धा त्याचा आकार बदलत असेल, हा दगड म्हणजेच “धातू” होय.
इ. स. पूर्व सुमारे ९००० ते ६००० च्या कालखंडात मध्य-पूर्व भागात मानवाला धातूचा शोध लागला असण्याची शक्यता आहे. मानवाला सापडलेला पहिला धातू ‘सोने’ की ‘तांबे’ ह्या बाबतीत अजूनही एकवाक्यता नाही. परंतु निसर्गात त्यामानाने तांबे जास्त प्रमाणात असल्यामुळेच, माणसाने ह्या धातू सोबत विविध प्रयोग करून पहिले. धातू सापडल्यानंतर इ. स. पूर्व ५००० ते ३००० ह्या कालखंडात मध्यपूर्वेतील मेसोपोटेमियाच्या सुमेर क्षेत्रात मानवाने धातुकांपासून (खनिज) धातू वेगळे करण्याची कला अवगत केल्याचे पुरावे सापडले आहेत. ह्याच काळात पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात तांबे, सोने, चांदी ह्या उपयुक्त धातुंसोबतच आर्सेनिक, जस्त, अँटिमनी व निकेल ह्या धातुंचाही शोध लागला होता.
इ. स. पूर्व ३००० ते १४०० च्या कालखंडात मानवाने धातू वितळवून त्याचे योग्य त्या आकाराच्या साच्यातून ओतकाम करण्याची पद्धत विकसित केली होती.
इ. स. पूर्व ३००० च्या काळात आर्सेनिक, अँटिमनि, लोह अथवा शिसे यांचे बरेच प्रमाण असलेले तांब्याचे मिश्रधातू बनवले गेले परंतु ते काही प्रमाणात ठिसूळ असल्यामुळे त्यांचा जास्त वापर झाला नाही.
इ. स. पूर्व २००० च्या काळात तांबे व कथिल ह्यांच्या मिश्रणातून “काशे” (Bronz) हा त्यामानाने कठीण परंतु कमी तापमानाला वितालाणारा धातू शोधून काढला, आणि येथूनच “कांस्य-युग” (Bronze Age) चा उत्कर्ष झाला. ह्याच कालखंडात युद्ध किंवा दुष्काळामुळे मध्यपूर्वेतील लोकांनी इजिप्त, युरोप, भारत व शक्यतो चीन मध्ये स्थलांतर केले असावे ज्यामुळे ह्या भागातही ब्राँझ चा प्रसार झाला.
इ. स. पूर्व २५०० च्या सुमारास सोने, चांदी व त्यांच्या मिश्र धातू बनवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.
इ. स. पूर्व २५०० ते १००० च्या कालखंडात भारतामध्ये राजस्थानातील अरवली पर्वताच्या खेत्री विभागात शुद्ध तांबे बनवणे व त्यात कथिल मिसळून बनणाऱ्या “काशे” ह्या मिश्र धातूच्या वस्तू इत्यादी ओतीव पद्धतीने बनवल्या जात होत्या.
इ. स. पूर्व १४०० च्या सुमारास लोखंडाचे महत्व वाढू लागले. इ. स. पूर्व १३०० च्या काळात काळ्या समुद्राच्या दक्षिण भागात व इ. स. पूर्व १२०० च्या काळात पॅलेस्टाइन भागात भट्ट्या व लोखंडी वस्तू असल्याचे पुरावे सापडले आहेत. ह्याच काळात कार्बन मिश्रित कठीण लोखंड तयार करण्याचे तंत्र सुद्धा अवगत असल्याचे दिसून येते.
इ. स. पूर्व ११०० च्या सुमारास युरोप, इ. स. पूर्व ७०० च्या सुमारास चीन आणि इ. स. पूर्व ५५ च्या सुमारास रोमन लीकांना लोखंड माहित झाले. भारतीयांना लोखंडाचे ज्ञान खूप पूर्वीपासूनच होते, इ. स. पूर्व १०० च्या काळात लिहिलेल्या गेलेल्या एका ग्रीक ग्रंथात ‘भारतीय लोक लोखंडाचा व्यापार करीत असल्याचा’ दाखला आहे.
इ. स. पूर्व १६०० पूर्वीच लोकांना तांबे, पितळ, जस्त यांच्या मिश्र धातूची माहिती असली तरीही; रोमन लोकांनी ह्या मिश्र धातूंची नाणी चलनात आणल्यानंतर त्यांची उपयुक्तता इतरांच्या लक्षात आली.
इ. स. पूर्व ५०० पर्यंत खाणकाम माध्यमातून धातुके मिळविण्याच्या कामात बरीच प्रगती झाली होती. ह्याच काळात मौल्यवान धातू शुद्ध करण्याची पद्धतही लोकांनी आत्मसात केली होती.
इ. स. पूर्व १०० पर्यंत पाऱ्याचा शोध लागला होता.
इ. स. १ च्या नंतर काही शतकात दोन मूलद्रव्यांपासून तिसरे मौल्यवान मूलद्रव्य बनविण्याचे बरेच अयशस्वी प्रयत्न केले; परंतु ह्या प्रयोगांतून धातू व संयुगे विषयी बरीच माहिती मिळाली.
इ. स. ६०० पासून १००० पर्यंत लोखंड हे खूपच महत्वाचे झाले होते व लोखंड बनवणारे व त्या संबंधित व्यवसायांची खूप प्रगती झाली होती.
इ. स. १४०० च्या दरम्यान लोखंडाला साधारण पर्याय म्हणून बीड पासून ओतकाम केले जात होते परंतु बीड हे ठिसूळ असल्यामुळे त्याचा वापर मर्यादित राहिला.
इ. स. १५०० ते १९०० पर्यंत सर्व धातू उत्पादक व्यवसाय हे उत्पादन तंत्र सुधारण्याच्या दिशेने कार्य करीत होते.
इ. स. १७४० मध्ये ब्रिटन मधील डाँकॅस्टर येथील बेंजामीन हंट्समन यांनी पोलाद वितळवण्याची विश्वासार्ह पद्धत विकसित केली.
इ. स. १६०० ते १८०० दरम्यान जस्त, बिस्मथ, आर्सेनिक, मँगॅनीज, प्लॅटिनम, निकेल आणि कोबाल्ट या धातूंचा मूलद्रव्य या दृष्टीने शोध लागला. (ह्यापूर्वी अर्सेनिक सारख्या धातूचा प्राचीन काळी मर्यादित प्रयोग झाला होता) इतर धातूंचा एकोणिसाव्या शतकात शोध लागला
इ. स. २०१६ पर्यंत एकूण ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे.
पहा: List of Elements / मूलद्रव्य यादी
1 टिप्पण्या
👍
उत्तर द्याहटवाSubject related questions, comments and suggestions are always welcome.
Emoji_Yashwant B Bhavsar, (STUDIO MEENAMEL)