2.2) What is Metal / धातू म्हणजे काय?

Before understand what is metal? धातू म्हणजे काय? हे समजण्यापूर्वी आपल्याला द्रव्य आणि मूलद्रव्य समजून घ्यावे लागेल.

धातू म्हणजे काय?

धातू म्हणजे काय? हे समजण्यापूर्वी आपल्याला द्रव्य आणि मूलद्रव्य समजून घ्यावे लागेल.

1)      Matter (द्रव्य)

            a)      Elements (मूलद्रव्य)

i)        Metals (धातू)

(1)    Ferrous Metals (लोहयुक्त धातू)

(a)   Pure Ferrous (शुद्ध लोह धातू)

(b)   Mixture of Ferrous (मिश्र लोहधातू)

(2)   Non Ferrous Metals (लोहेतर धातू)

(a)   Pure Non Ferrous (शुद्ध लोहेतर धातू)

(b)   Mixture of Non Ferrous (मिश्र लोहेतर धातू)

ii)      Non Metals (अधातू)

iii)    Metalloid (धातुसदृश्य)

            b)     Compounds

            c)      Mixtures

 

 

 

 

 

 

 

 

 

 

द्रव्य म्हणजे काय?

पृथ्वी, वातावरण, आपल्या सभोवताली असलेले सर्व घटक, पदार्थ  ज्यांना वस्तुमान आहे किंवा दुसऱ्या शब्दांत जे जे काही जागा व्यापते ते सर्व हे द्रव्यांचे (Matter) चे बनलेले आहेत.  ‘द्रव्य’ म्हणजे अणूंचे बंधन असते. तसेच द्रव्याच्या अवस्थेनुसार चार प्रकारात वर्गीकरण होते.

१.      स्थायुरूप / घन अवस्था (Solid State)

उदाहरण. दगड, लाकूड, धातू, प्लास्टिक, ई.

२.      द्रवरूप (Liquid State)

उदाहरण. पाणी, तेल, पारा, ई.

३.      वायुरूप (Gaseous stat)

उदाहरण. हायड्रोजन, ऑक्सिजन, ई.

४.     प्लाझ्मा [Plasma (प्लाझ्मा ही द्रव्याची अणु-रेणूंचे विद्युत चुंबकीय बंध असलेली वायुसदृश्य अवस्था आहे.)]

उदाहरण. फ्लोरोसंट लाईट, वेल्डिंग लाईट, तारे (सूर्य), विजेची स्पार्किंग, ई.

ह्या द्रव्याचे चे गुणधर्मानुसार तीन भागात वर्गीकरण होते. (पहा: मूलद्रव्य यादी)

१.      मूलद्रव्य (Elements)

मूलद्रव्याचे प्रत्येक कण एकसारख्याच अणू (  पदार्थाने) बनलेले असतात. कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येत नाही.

२.      संयुग (Compounds)

दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थ म्हणजे संयुगे होय. ह्याचे रासायनिक पद्धतीने विभाजन करता येते, भौतिक पद्धतीने नाही.

३.      मिश्रण (Mixture)

दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात. ह्यापासून तयर झालेल्या मिश्रणात मूल घटकांचे गुणधर्म कायम राहतात.  मिश्रणातील मूळ घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात.

मूलद्रव्यांच्या गुणाधार्मांनुसार  त्यांचे धातू , अधातू  व धातुसादृश्य अश्या तीन प्रकारांत वर्गीकरण होते.

१.      धातू (Metals) :

जी मूलद्रव्ये उष्णता व विद्युत सुवाहक असतात, ज्यांत तन्यता व वर्धानियाता हे गुण असतात, चकाकणारे असतात अश्या मूलद्रव्यांना “धातू” म्हणून संबोधले जाते. सर्वसाधारण धातू हे स्थायुरूप असतात. (अपवाद: पारा)

उदाहरण.

तांबे(Cu) , लोखंड(Fe) , ऍल्युमिनिअम(Al) , सोने (Au) , चांदी(Ag) , पारा(Hg) इ.

२.      अधातू (Non-Metals) :

जी मूलद्रव्ये उष्णता व विद्युत यांचे दुर्वाहक असतात (अपवाद: ग्राफाईट). जे तन्य किंवा वर्धानीय नसतात, ज्यांना चकाकी नसते (अपवाद: आयोडीन स्फटिक) अश्या मूलद्रव्यांना “अधातू” म्हटले जाते. अधातू हे स्थायू, द्रव व वायू ह्या तीनही रुपात आढळतात.

उदाहरण.

फॉस्फरस, कार्बन, गंधक, आयोडिन हे स्थायुरूप

ब्रोमीन द्रवरूप अवस्थेत असतो.

ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, निऑन हे सर्व वायुरूप

३.      धातुसदृश्य (Metalloid) :

ज्या मूलद्रव्यांचे काही गुणधर्म धातूंप्रमाणे; तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात. किंवा धातू व अधातू ह्यांच्या मिश्रणातून जे तयार झालेले असतात त्या मूलद्रव्यांना ‘धातुसदृश्य’ म्हणतात.

उदाहरण.

अर्सेनिक, सिलिकॉन, सेलनियम ही धातूसदृश आहेत,

‘धातू’ ह्या प्रकारातील ‘मूलद्रव्याचे’ त्यांच्या गुणधर्मानुसार लोहयुक्त व  लोहेतर धातू असे वर्गीकरण होते.

१.      लोहयुक्त धातू  (Ferrous Metals) :

ज्या धातू मूलद्रव्यात ‘लोहाचे’ प्रमाण जास्त असते अश्या धातूंना ‘लोहयुक्त धातू’ म्हणतात.

उदाहरण. लोखंड, स्टील, कार्बन स्टील, ई.

२.       लोहेतर धातू (Non-Ferrous Metals) :

ज्या धातू मूलद्रव्यात ‘लोहाचे’ प्रमाण नसते अश्या धातूंना ‘लोहेतर धातू’ म्हणतात.

उदाहरण. तांबे, सोने, चांदी, ई.

शुद्ध धातू व मिश्र धातू (Pure Metals & Mix Metals) :

·         इतर कुठल्याही मूलद्रव्यांचे मिश्रण नसलेला धातू म्हणजे शुद्ध धातू होय.

उदाहरण. लोखंड, तांबे, सोने, ई.

·         तसेच दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या मिश्रणातून तयार झालेला धातू म्हणजे मिश्र धातू होय.

उदाहरण. स्टील, पितळ, ब्राँझ, ई.

·         लोहयुक्त व लोहेतर दोन्ही प्रकारात शुद्ध धातू व मिश्र धातू  असतात.


Interactive Periodic Table of Elements

Ptable® website is Copyright © Dayah, M. (1997, October 1). Ptable: The Interactive Periodic Table. Retrieved June 4, 2020, from Ptable and Michael Dayah

visit to Ptable® website for detail

पुढील भागात वाचा

Physical Properties of Metals / धातूचे भौतिक गुणधर्म

Further Reading:

1.Metals and Non-Metals

2. Elements, Mixture & Compounds

Image by Gerd Altmann from Pixabay

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या