मागील भागात आपण कार्यशाळेत होणाऱ्या संभावित अपघातांचे स्त्रोत कोणते असू शकतात हे पाहिले. ह्या भागात कार्यशाळेत प्रवेश करतांना किंवा काम करतांना कोणते नियम व संकेत अवलंब करायचे ह्याची चर्चा करू.
कार्यशाळेत सुरक्षित व अपघात विरहीत काम करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याकरिता कार्यशाळेत काम करणारे कर्मचारी. विद्यार्थी, कलाकार सर्वांसाठी काही नियम व अटी बंधनकारक आहेत.
१. कुठल्याही प्रकारचा नशा करून कार्यशाळेत येण्यास सक्त मनाई आहे.
२. मद्यपान, ड्रग्स, इत्यादींचे व्यसन असलेल्यांना कार्यशाळेत परवानगी नाही.
३. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने परिणाम करणाऱ्या कोणत्याही शारीरिक तक्रारी, आजार (उदा. अपस्मार Epilepsy, फिट येणे, विशेष औषधे, दृष्टिदोष, श्रवणदोष, इत्यादी) असल्यास; सर्वप्रथम कार्यशाळेचे कर्मचारी/ मार्गदर्शक यांना आपल्या आजाराचा अहवाल देणे आवश्यक आहे.
४. प्रवेश करण्यापूर्वी प्रभारी (incharge) व्यवस्थापकांची परवानगी घ्या.
५. कार्यशाळेत प्रवेश करतांना सुरक्षा पोशाख, संरक्षक चष्मा, हातमोजे, बूट, हेल्मेट, इत्यादी परिधान केलेले असावेत.
६. सुरक्षा उपकरण हे संपूर्ण सुरक्षेसाठी नसून केवळ अपघाताचा प्रभाव कमी करण्यासाठी आहेत ह्याची जाणीव ठेऊन सुरक्षित काम करा.
७. कार्यशाळेत प्रवेश करतांना सैल कपडे परिधान करू नयेत तसेच लांब केसांना योग्य पद्धतीने घट्ट व बंदिस्त ठेवा.
८. अंगावरील दागिन्यांमुळे यंत्र वापरतांना अडचणी किंवा अपघात संभवतात; त्यामुळे असे दागिने कार्यशाळेत वापरू नयेत.
९. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पेय अथवा पेयजल कार्यशाळेत सेवन करण्यास मनाई आहे.
१०. कार्यशाळेत धावणे, दंगा-मस्ती करणे, संगीत वाजवणे, मोठ्याने बोलणे, इत्यादीस मनाई आहे.
११. कार्यशाळेत कुठल्याही प्रकारची वयक्तिक रॅगिंग, मस्करी करू नये तसे आढळल्यास त्वरित त्यांस प्रवेश बंदी करण्यात येईल.
१२. कार्यशाळेत उपलब्ध सर्व रसायने, पदार्थ, इंधन, इत्यादींवर ठळकपणे त्यांचे सर्वसाधारण नाव, रासायनिक संज्ञा व धोक्याचे चिन्ह / क्रमांक ह्याचे लेबल असावे.
१३. आवश्यक रसायन, पदार्थ, इंधन, इत्यदी पूर्ण संपण्यापूर्वीच त्याची मागणी करा, व्यवस्थापकांना सूचित करा.
१४. घातक पदार्थ असल्यास परवानगीशिवाय हात लावू नका.
१५. घातक रसायन, इंधन, वायू, इत्यादींची गळती होत असल्यास त्वरित सर्वांना सूचित करून, कार्यशाळा रिकामी करा व ‘सुरक्षा शिष्ठाचार’ Safety Protocol चा अवलंब करा.
१६. कार्यशाळेत असलेले कोणतेही उपकरण नादुरुस्त / सदोष / तुटलेले आढळल्यास; त्याचा वापर न करता, त्वरित प्रभारी व्यवस्थापक, कर्मचारी ह्यांना सूचित करावे.
१७. काही यंत्र, साधने केवळ पर्यवेक्षकांच्या देखरेखीत वापरायचे असतात. त्यांच्या उपस्थिती शिवाय अशी साधने वापरू नका.
१८. आपण वापरणार असलेल्या यंत्र, साधने ह्याकरीता योग्य संरक्षक उपकरणे, पोशाख यांचा वापर करा.
१९. यंत्र व साधने कशी वापरावीत ह्याबाबत आधी माहिती करून घ्या, नाहीती नसतांनाही ते वापरण्याचे धाडस करू नका.
२०. काम सुरवात करण्यापूर्वी व संपल्यानंतर आपले कार्यक्षेत्र, टेबल स्वच्छ करा. निरुपयोगी व भंगार यांची त्वरित योग्य विल्हेवाट लावा.
२१. उपकरणे, साहित्य व साधने यांची रचना समजून घ्या व वेळोवेळी त्यांचे देखभाल, ऑईलींग करा.
२२. विद्युत उकरणे वापरत असतांना किंवा वापरणाऱ्यासोबत बोलू नका.
२३. विद्युत भट्टी वापरतांना अग्निरोधक हातमोजे, फिल्टर गॉगल्स वापरा.
२४. भट्टीचा दरवाजा उघडतांना विद्युत प्रवाह खंडित करणारे स्वीच योग्य प्रकारे कार्य करीत असल्याची खात्री करा.
२५. आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मुख्य विद्युत प्रवाह खंडित करण्याची व्यवस्था समजून घ्या.
२६. गॅस भट्टी, शेगडी वापरण्यापूर्वी कार्यशाळेत पुरेसे अग्निशामक असल्याची खत्री करा व त्यांच्या वापराची माहिती घ्या.
२७. कार्यशाळा सोडण्यापूर्वी सर्व विद्युत उपकरणे बंद केल्याची खात्री करा.
२८. कामासाठी वापरलेले सर्व साहित्य पुन्हा जागेवर ठेवा.
२९. काम करतांना राहिलेले टाकाऊ वस्तू, भंगार ह्यांची योग्य विल्हेवाट लावा.
३०. आपत्कालीन स्थितीत मदत करणाऱ्या संस्थांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लिहिलेले असावेत.
३१. प्रथमोपचार पेटी ची जागा ही दर्शनी भागात व सहज मिळवता येईल अशी असावी.
३२. अपघात घडल्यास त्यावर करावयाचे प्रथमोपचार बाबत पर्यवेक्षकांकडून माहिती घ्या. (उदा. एसिड मुळे भाजणे, आगीने भाजणे, विषारी वायू मुळे श्वास घेण्यात अडचण, इत्यादी.)
३३. अपघात, आपत्कालीन परिस्थितीत शांतपणे, विचारपूर्वक निर्णय घेऊन कृती करा.
३४. सावधानी म्हणजेच सुरक्षा; प्रत्येक काम करतांना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करा.
सुरक्षितता सर्वप्रथम SAFETY FIRST
Image by Arek Socha from Pixabay
0 टिप्पण्या
Subject related questions, comments and suggestions are always welcome.
Emoji_Yashwant B Bhavsar, (STUDIO MEENAMEL)